Asia Cup 2023 : आशिया कपसाठी IND- PAK एकाच गटात; टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?

IND VS PAK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) गट फेरीची यादी जाहीर झाली असून यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. यानुसार आशिया कप मध्ये भारत पाक सामना पाहायला मिळणार आहे.

आशिया चषक यावेळी पाकिस्तानात होणार आहे. परंतु, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी गेल्या वर्षी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल असे सांगितले होते. टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होत. त्यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानने विरोध केला होता. त्यानंतर ही स्पर्धा कुठे खेळवली जाईल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

यापूर्वीच आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये झाला होता. 2016 मध्येही टी-२० फॉरमॅटमध्ये आशिया कप आयोजित करण्यात आला होता. यंदा मात्र याच्या फॉरमॅट मध्ये बदल करण्यात आला असून एकदिवसीय सामन्याच्या रूपाने आशिया चषक होणार आहे. १६ व्या आशिया कपमध्ये सुपर 4 आणि अंतिम फेरीसह एकूण 13 सामने होतील.

ग्रुप-ए              ग्रुप-बी
भारत              श्रीलंका
पाकिस्तान        बांग्लादेश
क्वालीफायर      अफगानिस्तान