नेपाळमध्ये खरी अयोध्या असल्याचा नेपाळी पंतप्रधानांचा दावा; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे असा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला. भगवान राम हे भारताचे नसून नेपाळचे असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे. केपी शर्मा ओली म्हणाले की, नेपाळमध्ये भारताने सांस्कृतिक अतिक्रमण केले आहे आणि आपल्या इथे बनावट अयोध्या तयार केली आहे. नेपाळी माध्यमांनी ओलीच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘अयोध्या’ नेपाळमध्ये आहे आणि ‘भगवान राम नेपाळी आहेत भारतीय नाहीत.’

 

ओली म्हणाले की, भारतात असलेली अयोध्या बनावट आहे, खरी अयोध्या तर नेपाळमध्ये आहे. नेपाळी पंतप्रधान पुढे म्हणाले कीं, “खरी अयोध्या नेपाळमध्ये असताना भारताने सांस्कृतिक अतिक्रमणासाठी आपल्या इथे बनावट अयोध्या तयार केली आहेत.” यापूर्वीही ओलीने भारताविषयी अशीच बडबड केली होती. अलीकडेच ते म्हणाले की, भारत त्यांना सत्तेवरून दूर करण्याचा कट रचत आहे.

 

 

ओली यांनी असा युक्तिवाद केला की, जर भारतातली अयोध्या ही जर खरी असेल तर राजकुमार लग्नासाठी जनकपुरात कसा येऊ शकेल? नेपाळमध्ये ज्ञान विज्ञानाचा उगम आणि विकास झाला असा दावा त्यांनी केला. त्यांनी यावेळी असाही दावा केला की, आम्ही सीतेला भारतातील अयोध्या राजपुत्र नव्हे तर नेपाळमधील अयोध्याच्या राजपुत्राला दिले. अयोध्या हे बीरगंजच्या अगदी पश्चिमेला गाव आहे. ओली म्हणाले, ‘भारतात बनविलेली अयोध्या ही खरी नाही आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.