विधानसभा निवडणूक 2021 Exit Poll : पहा कोणत्या राज्यात कुणाचे पारडे जड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमधील सर्व उमेदवारांचे भवितव्य (State राज्य विधानसभा निवडणूक एक्झीट पोल २०२१) ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. विधानसभा निवडणुकाकांच्या निकालासाठी प्रेत्येकजण २ मे ची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकालाच्या आधी निवडणूक झालेल्या सर्व राज्यांचे एक्सिट पोल्स हाती यायला सुरुवात झाली आहे. पाहुयात कोणत्या राज्यात कोणता पक्ष सरस ठरेल.

प.बंगाल

प. बंगाल विधानसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मनाली जात आहे. प. बंगाल मध्ये भाजपने प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याठिकाणी सभा घेऊन विजयी होण्याचा दावा केला आहे. टाईम्स नाऊ च्या मतदार एग्झिट पोलनुसार ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस बंगालमध्ये सत्तेत येताना दिसत आहे. त्याच बरोबर भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल तर कॉंग्रेसच्या खात्यात १९ जागांचा अंदाज आहे.

तामिळनाडू

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूमधील मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास द्रमुक-कॉंग्रेसला 46.7% मते मिळतील. एआयएडीएमके आणि भाजप आघाडीला 35 टक्के मते आणि इतरांना 18.3 टक्के मते पडू शकतात.

आसाम

एबीपी च्या मतदारांच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला आसामच्या १२6 जागांमध्ये 58-71आणि कॉंग्रेसला-53-66 जागा मिळतील. या व्यतिरिक्त 5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

केरळ

इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस-माय-इंडियाच्या एक्झिट पोलनुसार केरळमधील एलडीएफच्या मतदानाची टक्केवारी 47 टक्के होती, तर यूडीएफच्या खात्यात 38 टक्के आणि भाजपच्या मतांची टक्केवारी १२ टक्के होती. दुसरीकडे, जर आपण जागांविषयी चर्चा केली तर केरळमधील १४० जागांवर एलडीएफला १०4 ते १२० जागा मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय यूडीएफ खात्यात 20 ते 36 तर भाजपला शून्य ते 2 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Leave a Comment