हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशातील राजकारणाचे समीकरण पालटवणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Results) 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणुकांच्या निकालावर लागले आहे. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
एकंदरीत पाहायला गेले तर, पाच राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तसेच, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तेलंगणा हे केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आहे. त्याचबरोबर, मिझोराम हे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) द्वारे शासित आहे. त्यामुळे या सर्व राज्यांमध्ये भाजप, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये आपल्याला काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या सगळ्यात डेलीहंट तुमच्यापर्यंत विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट जलदपणे पोहोचवणार आहे. तसेच, प्रत्येक राज्यातील निकालाचे थेट कव्हरेज डेलीहंटवर तुम्हाला पाहता येणार आहे.
Dailyhunt कव्हरेज
विधानसभा निवडणुकांचे थेट निकाल, निवडणुकांची अचूक आकडेवारी देण्यास डेलीहंट कटिबद्ध राहणार आहे. डेलीहंट डेटावर लक्ष केंद्रित करून परिणामकारक विश्लेषण प्रदान करण्यावर जास्त भर देणार आहे. विधानसभा निवडणुकांचे निकालच नव्हे तर, प्रत्येक एका पक्षाबाबत करण्यात आलेला सखोल अभ्यास, ग्राउंड लेव्हलवर मिळवण्यात आलेला डेटा आणि निवडणूक निकालाचे विश्लेषण डेलीहंट कव्हरेजमार्फत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
Dailyhunt कव्हरेजमध्ये पुढील मुद्दे समाविष्ट असतील
1) पाच राज्यांमधील निकालांचे थेट लाइव्ह कव्हरेज
2) अचूक आकडेवारी, मागील निकालांशी तुलना
3) जागांचे अपडेट
4) लाइव्ह व्हिडिओ, व्हायरल मीम्स,
5) ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ
6) ट्विटरवरील ट्रेंड
7) सखोल विश्लेषण
8) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
9) निवडणुकांच्या सर्व घडामोडी