सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
जत पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पाणी येणार नाही. त्यासाठी संघर्षाचे मानसिकतेची तयारी ठेवली पाहिजे. त्याकरिता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक लढा त्याची गरज आहे तरच आपणाला भविष्यामध्ये पाणी येणार आहे. ही लढाई ‘आर या पार’ ची करावी लागणार आहे. म्हैसाळ विस्तारीत योजनेबाबत तत्वता मान्यता देण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यात पाणी खळखळणार असा शब्द दिला होता. ही योजनेचा फसवी आहे असा आरोप गोंधळेवाडी आणि चिकलगी येथील तपोवन भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी केला आहे पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा व म्हैसाळ योजनेबाबत व पुढील आंदोलनाची दिशा याकरीता गावाला त्या मेळाव्यात ते बोलत होते.
तुकाराम महाराज पुढे म्हणाले की, गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय या पायी दिंडीत काढण्यात आलेल्या पायी दिंडीला शासनाने दिलेल्या पत्राचा खुलासा व त्या पत्रातील पत्राचे पोल-खोल करण्यात आला. म्हैसाळ योजनेतील कृष्णा पाणी तंटा लवाद म्हैसाळ योजनेतील अंतर्भूत गावासाठी १७.४४ टीएमसी एवढे मान्यता दिली असून या पाण्याचे नियोजन निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रस्तावित ६४ गावाच्या सिंचन क्षेत्रासाठी योजनेमध्ये पाणी शिल्लक नाही. या ठिकाणी पाणी देण्याचे असल्यास त्याकरता अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी आवश्यक आहे.
ही बाब धोरणात्मक त्याकरीता स्तरावर मंजुरीची आवश्यकता आहे असे पत्र दिलेले असताना सुद्धा गेली 35 वर्षापासून राजकारणी मंडळी निवडणुका आले की पाणी देण्याचे गाजर दाखवतात. मुळात या योजनेतील पाणी शिल्लक नसताना गावाला पाणी कुठून देणार ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला .या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा काय घ्यावे ग्रामस्थांनी ठरवावा या ठिकाणी उपस्थित असलेल्या वंचित 64 गावातील ग्रामस्थांनी घ्यावं असे आवाहन त्यांनी केले.