Thursday, February 2, 2023

विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

- Advertisement -

कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते.

यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, माजी शहर अध्यक्ष प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते.

- Advertisement -

नुकतंच कराड काँग्रेस मध्ये पृथ्वीराज चव्हाण गट आणि विलासकाका उंडाळकर गट एकत्र आल्यामुळे फक्त कराडच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद नक्कीच वाढणार असून काँग्रेस बळकट होण्यास मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’