हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Exoplanet : अवकाश हे माणसांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरले आहे. असे म्हंटले जाते कि, आपल्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारची रहस्ये दडलेली आहेत. ज्याविषयी वैज्ञानिकांना अजूनही नीटपणे माहिती नाही. मात्र बदलत्या कालानुरूप जसजसे विज्ञान प्रगत होत आहे, तसतसा विश्वाच्या अनेक रहस्यांवरचा पडदाही उचलू लागला आहे. अजूनही अनेक असे खगोलशास्त्रज्ञ आहेत, जे अवकाशाशी संबंधित अनेक रहस्ये सोडवण्यात गुंतले आहेत. याच दरम्यान आता अवकाशात एक आश्चर्यकारक घटना घडली आली आहे ज्याने वैज्ञानिक बुचकळ्यात पडले आहेत.
आता खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह सापडला आहे जो पृथ्वीपासून सुमारे 12 प्रकाशवर्षे अंतर दूर आहे. या ग्रहाला YZ Ceti b असे नाव देण्यात आले आहे. या पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहावर चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण देखील असण्याची शक्यता देखील वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. CNN कडून अशी बातमी देण्यात आली आहे. Exoplanet
याबाबत बोलताना संशोधकांनी सांगितले की,” सूर्यातून नियमितपणे बाहेर पडणारे जास्त उर्जेचे कण आणि प्लाझ्मा विचलित करून त्याचे वातावरण टिकवून ठेवण्यास पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र मदत करते. यामुळे ग्रहावरील जीवन टिकवून राहण्यास मदत होते. तसेच यामुळे या ग्रहावर चुंबकीय क्षेत्राचे संभाव्य अस्तित्व त्या ग्रहावरील जीवसृष्टीची संभाव्यता दिसून येऊ शकेल.” Exoplanet
सेबॅस्टियन पिनेडा आणि जॅकी व्हिलाडसेन या वैज्ञानिकांनी रेडिओ दुर्बिणीचा वापर करून YZ सेटी मधून निघणाऱ्या रेडिओ सिग्नलचे परीक्षण केले. ज्याचे निकाल जर्नल नेचर एस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. “एखादा ग्रह वातावरणात टिकून राहील की नाही हे त्या ग्रहावरील मजबूत चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असू शकेल,” असे मत पिनेडा यांनी व्यक्त केले आहे. Exoplanet
पिनेडा पुढे म्हणाले कि,”आम्ही सुरुवातीचा स्फोट पाहिला, जो फारच सुंदर दिसत होता. मात्र जेव्हा आम्ही तो पुन्हा पाहिला तेव्हा येथे खरोखर काहीतरी असल्याचे दिसून आले”. यानंतर वैज्ञानिकांनी असा सिद्धांत मांडला की, ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र आणि तो फिरत असलेल्या ताऱ्यांमधील परस्परसंवादामुळे रेडिओ लहरी तयार होतात. तसेच अशा लहरींचा लांब अंतरावरून शोध घायचा असेल तर त्या खूप मजबूत असणे आवश्यक आहे.” Exoplanet
ते पुढे म्हणाले की,” ते पृथ्वीच्या आकाराच्या अशा लांबच्या, लहान ग्रहांचे हे अदृश्य चुंबकीय क्षेत्र पाहण्यासाठी एका पद्धतीचा शोध घेत आहेत. याआधीही, मोठ्या गुरू-आकाराच्या ग्रहांवर चुंबकीय क्षेत्रे आढळून आली आहेत. जर एखाद्या ग्रहाकडे चुंबकीय क्षेत्र असेल आणि तो पुरेशा ताऱ्यांमधून वावरतो ज्यामुळे तारा तेजस्वी रेडिओ लहरी उत्सर्जित करतो,” असा निष्कर्ष त्यांनी यावेळी काढला.
हे पण वाचा :
Murder : चिकन करी वरून बाप-लेकात जुंपली; पित्याकडून मुलाचा खून
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
Give Plastic And Take Gold : ‘प्लास्टिक द्या आणि सोने घ्या’, प्लास्टिक मुक्तीसाठी ‘या’ गावाने सुरु केली अनोखी योजना
Success Story : रिक्षाचालकाने सुरु केला स्वतःचा स्टार्टअप, IIT-IIM मधील पदवीधर करतायंत त्याच्यासाठी काम