वयाच्या 94व्या वर्षी आजींनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करत मिळवलं जागतिक सुवर्णपदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्हणतात ना कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. या प्रत्यय देणारे एक उदाहरण समोर आले आहे. एका 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) या आजींनी तरुणाईला लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंट म्हणजेच वेगात चालण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. या आजीबाईंच्या (Bhagwani Devi Dagar) या अनोख्या कामगिरीमुळे तरुणाई देखील अवाक झाली आहे.

भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) या आजींनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं. तुम्ही म्हणाल वयाच्या शंभराला टेकलेल्या आजींनी (Bhagwani Devi Dagar) ही किमया कशी पार केली. तर यापुढे ऐका, या आजी इथंच थांबत नाही. त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यामध्येदेखील त्यांनी कांस्यपदक मिळवले आहे. सोशल मीडियावर या आजींनी केलेल्या कामगिरीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा (Bhagwani Devi Dagar) फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. क्रीडा मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये ‘भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी (Bhagwani Devi Dagar) पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.’ असे म्हंटले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment