कराड प्रतिनिधी | सद्या तीव्र उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत घराबाहेर कोणी पडताना दिसत नाही. तसेच शहरातील सिग्नलही बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकीशह चारचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत. मात्र, सिग्नलवर येताच अचानक ब्रेक दाबल्यास वाहनांची धडक होत आहे. त्यामुळे किरकोळ कारणावरून वाहनचालकांच्या वाद होत आहेत. अशीच घटना रविवारी कराड येथील स्व, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय समोर भर सिग्नलला चौकात घडली. या ठिकाणी अका ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला कारण त्याच्या समोर अचानक अक दुचाकीस्वार आला. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक दाबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, दुचाकी व ट्रक चालकाच्यात वादावादी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक नवीन नंबर प्लेट नसलेला ट्रक कृष्णा नाक्यावरून कराडच्या दिशेने निघाला होता. यावेळी तो ट्रक कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरात आला. या ठिकाणी असलेल्या सिग्नलवरून सबंधित ट्रक जात असताना त्याचवेळी एक दुचाकी समोरून जात होती. ट्रक संबंधित दुचाकी ट्रकच्या खाली जाणार येवढ्या वेळेत ट्रक चालकाने ब्रेक दाबला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र यानंतर वेगळेच घडले. ट्रक खाली जाणाऱ्या दुचाकीवरील दुचाकीस्वाराला पारा चांगलाच चढला. त्याने ट्रक चालकास बोलण्यास सुरुवात केली. तसेच ट्रकच्या केबिन बाहेर येण्यास सागितले.
सिग्नलवर ट्रक चालकांने अचानक दाबला ब्रेक अन् पुढं घडलं अस काही..#hellomaharashtra #karad pic.twitter.com/Lgv0QpUYXS
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 7, 2023
यावेळी ट्रक चालक ट्रकमधून खाली उतरला नाही. त्याने आत मधूनच बोलण्यास सुरुवात केली. संतापलेल्या दुचाकीस्वाराने ट्रक चालकास बोलण्यास सुरुवात केली. त्यांचे भांडण बघून हळूहळू लोक जमा झाले. गर्दी वाढत असलेली बघतच ट्रक चालकाने त्या ठिकाणाहून धूम ठोकली.