संक्रांतीच्या काळात पतंगीच्या मांजामुळे जाऊ शकतो जीव; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मकर संक्रांती आली की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच पतंग उडवण्याची लगबग सुरू होते. संक्रातीच्या दिवशी आपल्याला आकाशात सर्वत्र पतंगच दिसतात. परंतु या पतंगीसाठी वापरण्यात आलेल्या मांज्यामुळे लोकांची मान कापल्याच्या घटना देखील घडतात. अनेकांच्या तर डोळ्यात मांजा गेल्याचे प्रकार देखील घडतात. त्यामुळे या पतंगीच्या मांजा पासून कसे वाचवावे असे कोडे सर्वांनाच पडते. परंतु तुम्ही काही ट्रिक्स वापरून या मांजापासून स्वतःला वाचवू शकता. ते कसे जाणून घ्या.

मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला सर्वत्र पतंग उडताना दिसतात. परंतु या पतंगीच्या मांजामुळे पक्षांनाच नव्हे तर माणसांना देखील हानी पोहोचते. त्यामुळे हानी पोहोचवणारे चायनीज मांजे वापरण्यास सरकारने बंदी आणली आहे. असे असताना देखील काही दुकाने छुप्या पद्धतीने हे मांजे विकतात. परिणामी यामुळे माणसांना दुखावत होते. इतकेच नव्हे तर, अनेकवेळा या एका मांजामुळे माणसाचा जीव देखील जातो.

स्वतःचे संरक्षण कसे करावे?

त्यामुळे या मांजापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही ही सरळ साधी सोपी गोष्ट करू शकता. तुम्ही बाईक किंवा स्कूटर चालवत असाल तर, तुम्ही पातळ स्टेनलेस स्टीलची सुरक्षा वायर वापरू शकता. ही वायर तुमच्या दुचाकीच्या हँडलवर बसवा. याने समोरून एखादा मांजा आडवा आला तरी तो वायरमुळे अडकेल. याने तुम्हाला देखील समजेल की मांजा मध्ये आडवा आला आहे. ही सरळ साधी गोष्ट करून तुम्ही स्वतःचे प्राण वाचवू शकता.