Atal Setu : अटल सेतू 14 तासांसाठी बंद; पहा काय आहे पर्यायी मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Atal Setu : जानेवारी महिन्यात उद्घाटन झालेल्या सागरी अटल सेतूचा (Atal Setu) प्रवासी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. एवढेच नव्हे तर महिन्याभरात तब्बल 13 कोटींचा टोल या मार्गावरून जमा झाला आहे. तुम्ही देखील या मार्गाचा वापर करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 14 तासांसाठी अटल सेतू बंद राहणार आहे.

या कालावधीत प्रवास बंदी

आज दिनांक 17 फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना अटल सेतूवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.अटल बिहारी वाजपेयी शेवडी नाव्हा सेवा (Atal Setu) , टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगातून रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन अँड टर्बो सी ब्रिज मॅरेथॉन’ आयोजन करण्यात आला आहे त्यामुळे सी लिंक बंद असणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली असून सेतूवरून येव-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोणता आहे पर्यायी मार्ग? (Atal Setu)

17 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत अटल सेतू वरून वाहतूक बंद करण्यात आल्या कारणामुळे वाहतुकीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये उरण (Atal Setu) कडून अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा वाशीमार्गे पुढे इच्छित स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

तर पुण्याहून अटल सेतू (Atal Setu) मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने बेलापूर, वाशीमार्गे पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच जुना मुंबई पुणे हायवे व कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेल कडून येणाऱ्या वाहनांना देखील गव्हाण फाटा उरण फाटा वाशी मार्गे पुढे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी मार्ग निषेध करण्यात आला आहे.

जेएनपीटी कडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटा मार्गे उलवे, आम्र मार्ग, वाशी खाडी पुला मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला असून या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलीस वाहन अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर (Atal Setu) अत्यावश्यक सेवातील वाहन तसेच मॅरेथॉन मधील वाहनांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर आज रात्री आणि उद्या अटल सेतू वरून प्रवास करणार असाल तर या पर्यायी मार्गांचा वापर निश्चित करा.