हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Atal Setu Free Toll। टोल माफी बाबत महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. मुमबीच्या वैभवात वाढ करणाऱ्या अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हि टोल माफी फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच असेल. म्हणजे काय तर तुम्ही इलेक्ट्रिक गाडीतून अटल सेतूवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला कसलाही टोल आकारला जाणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे फक्त मुंबईकरच नव्हे तर अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या सर्वानाच फायदा होणार आहे. मुंबईत तर इलेक्ट्रिक वाहनधानरकांची संख्या जास्त आहे, त्यांच्या पैशाची मोठी बचत या निर्णयामुळे होणार आहे.
खरं तर एप्रिल महिन्यात राज्य सरकारकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले. त्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसना टोल माफी (Atal Setu Free Toll) जाहीर करण्यात आली होती. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली होती. त्यानुसार आता या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. आजपासून शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्या- Atal Setu Free Toll
या गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेस, खासगी व प्रवासी हलकी चारचाकी वाहने, राज्य परिवहन तसेच शहरी परिवहन प्रवासी वाहने या वाहनांचा समावेश असेल. मुंबईत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्या आहेत. यामध्ये १८,४०० हलक्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे, २,५०० हलकी प्रवासी वाहने, १,२०० अवजड प्रवासी वाहने आणि ३०० मध्यम प्रवासी गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाडयांना आता अटल सेतूवरून अगदी मोफत मध्ये प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे फक्त अटल सेतूवरच नाही तर राज्यातील इतरही महत्त्वाच्या दोन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय आता घेतला जाऊ शकतो. अटल सेतू प्रमाणेच आता मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावर सुद्धा लवकरच इलेक्ट्रिक वाहणांना टोल माफी (Atal Setu Free Toll) दिली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या धोरणामुळॆ पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला आणि इलेक्ट्रिक गाडयांना मोठं बळ मिळत आहे.




