बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय Ather 450 Apex, जबरदस्त फीचर्स आणि किंमतही कमी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ather 450 Apex : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाइक सतत लॉन्च होत आहेत. तरुणांमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत क्रेझ खूप वाढत आहे. कारण देशातील पेट्रोल व डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन लोक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. अशा वेळी तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण भारतीय बाजारात Ather 450 Apex ही हाय स्पीड स्कूटर लॉन्च होणार आहे. तुमच्यासाठी ही एक उत्तम व परवडणारी स्कूटर ठरणार आहे. ही स्कूटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग फक्त दोन ते तीन सेकंदात घेते. त्यामुळे ही एक हाय स्पीड स्कूटर असल्याचे सिद्ध होत आहे.

सुरक्षेच्या बाबतीत देखील ही एक सर्वोत्तम स्कूटर आहे जी नवीन स्कूटर कंपनीच्या Junya Ather 450x च्या पुढे आहे. या नवीन स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील उपलब्ध असतील. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि स्मार्ट लूक हँडलबार दिला जाईल. ही स्कूटर ताशी 90 किमीपेक्षा जास्त वेगाने धावू शकते.

Ather 450 Apex बद्दल जाणून घ्या

एथरची नवीन स्कूटर सध्या बाजारात असलेल्या कंपनीच्या सर्व स्कूटर्समध्ये टॉप व्हेरिएंट असेल. यामध्ये रियर टाईम स्पीड, मोबाईल कनेक्टिव्हिटी, बॅटरी चार्जिंग कॅपॅसिटी आदींची माहिती मिळणार आहे. तुम्हाला या स्कूटरमध्ये स्टायलिश हँडलबार आणि डिजिटल डिस्प्लेसह अतिशय आरामदायक सिंगल सीट असेल असा अंदाज आहे. या स्कूटरचा लूक देखील खूप उत्तम असणार आहे ज्यामध्ये ड्युअल बॉडी कलर आणि ग्राफिक्स दिले जाऊ शकतात.

26 एनएमचा पीक टॉर्क

याबाबत कंपणीचे सीईओ तरुण मेहता यांनी काही मते मांडली आहेत. ते बोलतात की, ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात जास्त गती असलेली स्कूटर असेल. सध्या कंपनीने त्याच्या किंमती आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही. ही स्कूटर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 2024 मध्ये लॉन्च होईल असा अंदाज आहे.

दरम्यान, तुम्हाला सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Ather 450X बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 3.7 kWh ची पॉवरफुल बॅटरी सेटअप आहे. ही स्कूटर 6.4 kW ची पॉवर आणि 26 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच Ather 450X रुपये 1.68 लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. Ather 450X व्यतिरिक्त Ather 450S देखील बाजारात उपलब्ध आहे. Ather 450 Apex ची सुरुवातीची किंमत 2 लाख रुपये आहे.