हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एथर एनर्जी (Ather Energy) ने ग्राहकांसाठी एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. एथर एनर्जीने त्यांच्या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर 450X चे 2025 मॉडेल सादर केले आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने नवीन फीचर्स आणि ड्राइविंग रेंज देऊन त्याला आकर्षक बनवले आहे. तसेच लाँच होताच कंपनीने 2025 Ather 450X च्या बुकिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. तर चला या इलेक्ट्रिक स्कूटर बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Ather 450X मधील प्रगत फीचर्स –
नव्या Ather 450X मध्ये काही प्रगत फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामध्ये तीन ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स दिले आहेत . त्यात रेन, रोड आणि सॅंडी (रेती) यांचा समावेश आहे. या मोड्समुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर स्कूटरला योग्य प्रकारे नियंत्रित करता येते. ग्राहकांना या ट्रॅक्शन कंट्रोलला पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच, Ather Magic Twist Regenerative Braking System हे महत्त्वाचे फीचर देखील या स्कूटरमध्ये देण्यात आले आहे, ज्यामुळे बऱ्याच वेळा सामान्य ब्रेक्सची गरज भासत नाही.
नवीन टायर्स डिझाइन –
Ather 450X स्कूटरमध्ये ( Electric scooters ) हार्डवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे ड्रायव्हिंग रेंजमध्ये मोठी वाढ झाली आहे. MRF च्या सहकार्याने Zapper Ne-Tred नावाचे नवीन टायर्स डिझाइन करण्यात आले आहेत, जे स्कूटरच्या रेंजला 25% पर्यंत वाढवतात. 2.9kWh वेरिएंटची रेंज 85 किमीवरून 105 किमीपर्यंत वाढली आहे, तर 3.7kWh वेरिएंटची रेंज 130 किमीपर्यंत झाली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक लांब अंतराचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना दूरच्या ठिकाणी आरामात प्रवास करता येणार आहे.
स्मार्ट फिचर्सचा समावेश –
नव्या Ather 450X मध्ये स्मार्ट फीचर्स आणि सॉफ्टवेअरची देखील भर पडली आहे. प्रो पॅक घेणाऱ्या ग्राहकांना Ather Stack 6 सॉफ्टवेअर मिळेल, ज्यामध्ये Google Maps, Alexa कनेक्टिव्हिटी, WhatsApp नोटिफिकेशन्स, Ping My Scooter आणि लाइव्ह लोकेशन शेअरिंग यांसारख्या अनेक स्मार्ट फिचर्सचा समावेश आहे. हे फीचर्स ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि स्मार्ट बनतील , तसेच अधिक सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची उत्तम ठरतील .
स्कूटर तीन तासांत 80% चार्ज –
स्कूटरची चार्जिंग सुविधाही चांगली करण्यात आली आहे. 2.9kWh वेरिएंटसोबत Ather Duo 700W होम चार्जर मोफत दिले जात आहे, ज्यामुळे स्कूटर केवळ तीन तासांत 80% चार्ज होऊ शकते. या वेगवान चार्जिंग सुविधेमुळे ग्राहकांना त्यांची स्कूटर कमी वेळात अधिक वेळ चालवता येईल, यामुळे त्यांना प्रवासासाठी जास्त तयारी करण्याची आवश्यकता भासणार नाही . एथर एनर्जीचे नवीन 450X स्कूटर प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट फीचर्ससाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
Ather 450X स्कूटरच्या किंमती –
2025 मध्ये लाँच झालेल्या Ather 450X स्कूटरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 2.9kWh वेरिएंटची नवीन किंमत 1.47 लाख (एक्स-शोरूम) आणि 3.7kWh वेरिएंटची किंमत 1.57 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने या दोन्ही वेरिएंट्सच्या किमतीत अनुक्रमे 6,400 आणि 2,000 ची वाढ केली आहे. तसेच यात ग्राहकांसाठी प्रो पॅकचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 2.9kWh वेरिएंटसाठी प्रो पॅकची किंमत 17,000 आणि 3.7kWh वेरिएंटसाठी प्रो पॅकची किंमत 20,000 आहे.