Ather 450X चे नवीन बेस व्हेरियंट लाँच, 146 KM रेंज; किंमत किती?

Two Wheeler
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना आपली पसंती दर्शवली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माण कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ- स्कुटर कंपनी ather ने आपल्या Ather 450x चे बेस व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 98,079 रुपये ठेवण्यात आली आहे.

146 किलोमीटर रेंज –

Ather 450X च्या या बेस व्हेरिएन्टमध्ये 3.7 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला असून हि बॅटरी 6.4 kW पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 90 किलोमीटर /प्रतितास असून Ather 450X अवघ्या 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग वाढवू शकतो. या इलेक्ट्रिक स्कुटरचा सर्वात मोठा drawback म्हणजे तिला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 15 तास 20 मिनिटे इतका मोठा कालावधी लागतो. परंतु ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 146 किलोमीटर पर्यंत धावू शकते.

किंमत किती?

Ather 450X च्या या बेस व्हेरिएन्ट इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत फक्त 98,079 रुपये आहे. ather च्या इतर इ – स्कुटरच्या तुलनेत ही किंमत नक्कीच कमी आहे. तसेच कंपनी कडून या बेस व्हेरियंटवर बॅटरीसाठी 30,000 किमी किंवा 3 वर्षांची वॉरंटी सुद्धा देण्यात आली आहे.