ATM Card द्वारे अशा प्रकारे मिळवा 5 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेच्या प्रत्येक खातेधारकाला बँकेकडून ATM Card दिले जाते. याद्वारे लोकांना कॅश काढण्यापासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंतची सुविधा मिळते. मात्र कॅश काढण्याव्यतिरिक्त एटीएम कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याची माहिती आपल्यातील अनेकांकडे नाही. हे जाणून घ्या कि, बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्शुरन्सचा लाभ दिला जातो. मात्र माहिती नसल्यामुळे अनेकांना याचा फायदा घेता येत नाही.

SBI Debit Card holder? Know these 12 'Golden Rules' for safe ATM  transactions | Zee Business

कोणाकोणाला मिळेल फायदा ???

हे जाणून घ्या कि, ज्या लोकांनी किमान 45 दिवस ATM Card  चा वापर केला आहे फक्त अशा लोकांनाच एटीएम कार्डवरील विम्याचा लाभ मिळेल. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी बँकेच्या एटीएम कार्डसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. यासोबतच आपल्या एटीएम कार्डच्या कॅटेगिरीवरही हा लाभ अवलंबून असेल.

This ATM card will help you to get Rs 10 lakh; Know how to make this card

वेगवेगळ्या कार्ड्सनुसार कव्हरेज उपलब्ध

हे जाणून घ्या कि, आपल्या ATM Card च्या कॅटेगिरीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाईल. यामधील क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, सामान्य मास्टर कार्डवर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये तसेच व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर उपलब्ध असेल. तसेच प्रधानमंत्री जन धन खात्यांवर उपलब्ध असलेल्या RuPay कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळेल. त्याच प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतच्या इन्शुरन्सचा लाभ मिळू शकेल.

ATM vs. Debit Cards – Have You Ever Wondered How They Differ?

अशा प्रकारे करा क्लेम

जर एखाद्या एटीएम कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर कार्डधारकाच्या नॉमिनीला त्या व्यक्तीचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन भरपाईसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर बँकेमध्ये यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून नॉमिनीला इन्शुरन्स क्लेम मिळेल. यासाठीची सर्वात महत्त्वाची बाब अशी कि, जर बँकेचे ATM Card वापरल्यानंतर 45 दिवसांच्या आत मृत्यू किंवा अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीवर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नुकसानभरपाईसाठी क्लेम करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/cards/debit-card/insurance-covers-available

हे पण वाचा :
बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे
SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज
Stock Market : येत्या काळात ‘या’ सेक्टर्समधील शेअर्स देऊ शकतील जबरदस्त रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर