ATM Card | आजकाल प्रत्येक व्यक्तीचे बँकेत अकाउंट असणाऱ्या व्यक्तीकडे एटीएम कार्ड असते. एटीएम कार्डचा (ATM Card) वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डमध्ये आपल्याला कॅश पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागत नाही. तुम्ही एटीएममध्ये जाऊन देईल पैसे काढू शकता. परंतु या एटीएमचे आणखी बरेच फायदे असते. ज्याबद्दल अजूनही अनेक लोकांना माहिती नाही. एटीएम कार्डच्या (ATM Card) माध्यमातून नागरिकांसाठी अनेक सुविधा पुरविल्या जातात. परंतु लोकांना त्याची माहिती नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. काही बँका देखील त्यांच्या ग्राहकांना माहिती देत नाही. आज आपण एटीएम कार्डचे फायदे जाणून घेणार आहोत. ज्यावेळी तुम्हाला बँकेकडून एटीएम (ATM) कार्ड दिले जाते, त्यावेळी ग्राहकांना अपघात विमा तसेच अकाली मृत्यू झाल्यानंतर विमा देखील मिळतो. परंतु एटीएम कार्डधारकांना याबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना या विम्याचा लाभ मिळत नाही.
या बँकेचे एटीएम कार्ड विमा पुरवते | ATM Card
एटीएम कार्डच्या नियमानुसार एटीएम कार्डधारकाचा अपघात झाला किंवा अकाली मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमानुसार तुम्ही 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम वापरत असाल, तर एटीएमकडून तुम्हाला विम्याची रक्कम दिले जाते.
तुमच्याकडे जर क्लासिक एटीएम कार्ड असेल, तर तुम्हाला एक लाख रुपयांचा विमा मिळतो. तसेच ऑर्डीनरी कार्डवर तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. प्लॅटिनम मास्टर कार्डवर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा विमा मिळेल. तसेच प्लॅटिनम मास्टर कार्ड तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. तसेच व्हिसा कार्डवर एक लाखापर्यंतचा विमा मिळतो. तसेच रूपे कार्डवर तुम्हाला एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.
तुम्ही जर वर नमूद केलेले कोणतेही एटीएम कार्ड (ATM Card) वापरत असाल, तर त्यानुसार तुम्हाला विमा दिला जातो. अपघातामध्ये जर कार्ड धारकाचा एक हात किंवा पाय अपंग असल्यास त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा विमा दिला जातो. तसेच एखाद्याचे दोन हात किंवा पायांना अपंगत्व आलेले असेल, तसेच मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीला एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. एखाद्या व्यक्तीचा जर अकाली मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला बँक शाखेत विमासाठी दावा करता येतो. त्यासाठी कुटुंबीयांना काही कागदपत्र बँकेत जमा करावी लागतात. त्यानंतर त्यांना विम्याचे पैसे मिळतात.