१ जानेवारीपासून जुने एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड होणार रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | तुम्ही एटीएम, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सद्या वापरात असलेले चुंबकीय पट्टीचे (मॅग्नेटिक स्ट्रिप) एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, सार्वजनिक आणि खासगी बँकांना प्रचलित असलेली फक्त मॅग्नेटिक स्ट्रिपची जुने कार्डे बंद करावी लागणार आहेत. १ जानेवारी २०१९ पासून खातेदारांना केवळ अद्ययावत एटीएम आणि डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. याशिवाय नव्या वर्षाच्या आरंभापासून बँकां प्रचलित चेकबुक ऐवजी नवीन चेकबुक देणार आहेत.

जुन्या एटीएम कार्डांमध्ये फक्त मॅग्‍नेटिक चिप आहे. अशी एटीएम कार्डे सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आत आरबीआयच्या नियमावलीनुसार सर्वप्रकारचा गैरवापर थांबविण्यासाठी बँकांनी ही उपाययोजना केली आहे.

Leave a Comment