२ हजारांची नाेट एटीएममधून झाली बाद? केवळ १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे वितरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नोटबंदी करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ४ वर्षांपूर्वी १००० आणि ५०० रुपयांच्या नाेटा चलनातून रद्द केल्यानंतर २००० रुपयांची नवी नाेट चलनात आणली हाेती. आता मात्र ही नाेट एटीएममधून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. नाेटाबंदीनंतर २००० रुपयांच्या गुलाबी नाेटेची खूप चर्चा झाली. आता या नाेटेचे बँकेकडून वितरण जवळपास बंद झाले आहे.

बँकांकडूनही नव्या २००० रुपयांच्या नाेटा देण्यात येत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक बँका केवळ १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नाेटा एटीएममध्ये भरत आहेत. बँकेनेही नाेटचे वितरण केलेले नाही. त्यामुळे बँकांनी एटीएम मधून नव्याने कॅलिबरेशन सुरू केले आहे.

एटीएममध्येही भरणा बंद
काही बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपासून २००० रुपयांच्या नाेटा मिळालेल्या नाहीत. बँकांमध्ये जमा करण्यात येत असलेल्या नाेटा एटीएममध्येही भरण्याचे बंद झाले आहे. नव्या नाेटेची छपाई बंद करण्यात आल्याचीही माहिती आहे. परंतु, आरबीआयने त्यास दुजोरा दिलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

Leave a Comment