कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आज रात्री ATM टार्गेट होणार, सायरन वाजवून गाड्या फिरवा असा मेसेज कराड शहर पोलिस परिवार व्हाटसग्रुपला पडला. अन् चक्क दोनच तासात ATM टार्गेट झाले. त्यामुळे या मेसेजमुळे पोलिस टीम अलर्ट झाली होती. कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मेसेजची सध्या पोलिस दलात चांगलीच चर्चा सुरू आहे.
कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज रात्री ATM आणि बंद घरे टार्गेट होणार असे वाटते. सायरन लावून गाड्या फिरवा असा मेसेज ग्रुपवर सोमवारी मध्यरात्री 12.46 मिनिटांनी पडला. त्यानंतर पहाटे 2 वाजून 48 मिनिटांनी गजानन हाैसिंगिग सोसायटीतील बॅंक आॅफ इंडियाचे ATM टार्गेट झाले. पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून एका चोरट्यासही पकडले. त्यामुळे पळून गेलेल्या तीन्ही चोरट्यांची नावे समजली असून एक डाॅक्टर, एक प्रवचनकार यांचाही समावेश आहे. तर कराड तालुक्यातील करवडी येथील एका संशयिताचा समावेश आहे.
कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांची प्रशासनातील पकड मजबूत आहे. तसेच लोकांच्यातील मिळून मिसळून काम करणारा अशी अोळख आहे. त्यामुळे व्हाॅटसअप ग्रुपवर पडलेल्या या मेसेजची पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसह कराड शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर चार पोलिस कर्मचाऱ्यांचाही जोरदार चर्चा सुरू असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या चारही कर्मचाऱ्यांवर पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, कराडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी काैतुकाचा वर्षाव केला.