औरंगाबाद – विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून 15 फेब्रुवारी 2021 ते 29 जानेवारी 2022 दरम्यान अत्याचार करणाऱ्या छावणी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाच्या विरोधात छावणी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण पवार असे आरोपी शिपायाचे नाव आहे.
छावणी ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पीडिता ही नवऱ्यासोबत वाद असल्यामुळे विभक्त राहते. तिला दोन मुले आहेत. 2021 मध्ये ती एका मॉलमध्ये कामाला असताना त्या ठिकाणी शिपाई संदीप कामानिमित्त गेला होता. त्या वेळी दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून पवारने तिला दोन मुलांसह स्वीकारून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच 15 फेब्रुवारी 2019 ते 29 जानेवारी दोन हजार बावीस दरम्यान जबरदस्तीने संपर्क प्रस्थापित केले. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. या काळात तिच्याकडून आठ ते दहा लाख रुपये उकळले. ती 28 ऑगस्ट 2019 रोजी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे सोनोग्राफी केल्यानंतर स्पष्ट झाले. तेव्हा तिने पवारला लग्नाबाबत आग्रहाची मागणी केली, तेव्हा पवारने गर्भपात कर नाहीतर तुझ्या मुलांना मारून टाकेल अशी धमकी दिली.
तसेच जबरदस्तीने एका खाजगी रुग्णालयात गर्भपात केला. पवार वारंवार धमकी देऊन, माझ्यावर गुन्हा दाखल असून तू माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, असे नेहमी बोलत असल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे.