व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मिरारोडमध्ये भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

मीरारोड : हॅलो महाराष्ट्र – मिरारोडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला (fatal attack) करण्यात आला. य हल्ल्यामुळे मिरारोड भाजपात एकच खळबळ माजली आहे. रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात महिला पदाधिकारी सुल्ताना खान जखमी झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. सुल्ताना खान यांच्या गाडीवर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी अचानक हल्ला (fatal attack) चढवला. दोन अज्ञात इसमांनी मध्यरात्री त्यांच्यावर हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. रविवारी रात्री सुल्ताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मिरारोड मधील नया नगर जवळ दुचाकी वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला (fatal attack) केला. तसेच धारदार वस्तूने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

या हल्ल्यावेळी (fatal attack) पतीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित नेत्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या. त्या जबाब देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पीडित महिलेचा जबाब नोंदवला जाईल त्यानंतर दोषी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

सुल्ताना खान यांच्यावर हल्ला (fatal attack) कुणी केली, राजकीय आकसातून हा हल्ला करण्यात आला होता की या मागे आणखी वेगळं काही कारण आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या हल्लाप्रकरणी (fatal attack) सुल्ताना खान याचे पती समीर खान यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या सुल्ताना खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रामलखन यादव यांनी दिली आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?