जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा | शेरेवाडी (ता. सातारा) येथील सचिन स्वामी या युवकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी सचिन याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले होते. मात्र यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

शेरेवाडी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच माने कुटुबियांच्या अन्याला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे सचिन स्वामी यांनी सांगितले. आपणांस न्याय मिळावा यासाठी संबधित विभागास वारंवार निवेदन तसेच माहिती देवूनही दुर्लक्ष होत असल्याने टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती स्वामी यांने दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. सचिन स्वामी याने न्याय मिळत नसल्याने स्वताःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.