attempt to kill : लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । attempt to kill :  पुण्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to kill ) करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ नजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. राहुल श्रीशैल निरजे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात (attempt to kill ) पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपीचे पीडित तरुणीशी प्रेमसंबंध होते

आरोपी राहुल निरजे हा पीडित तरुणीवर प्रेम करत होता. या तरुणीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. याच रागातून त्याने या युवतीला शेतात गाठून तिचा गळा चिरत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to kill ) केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात (attempt to kill ) पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर राहुल निरजे याला पोलिसांनी अटक केली असून त्याची पुढील चौकशी सुरु आहे.

पिंपरीत सिगरेटच्या वादातून अल्पवयीन मुलाची हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राला सिगरेट दिली नाही म्हणून दोन मित्रांनी कोयत्याने वार करुन 15 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली होती. सुमित बनसोडे असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पाच ते सात मित्र जुना जकात नाका येथे जंगलात दारु पिऊन नाचत होते. यावेळी एका मित्राने सुमितकडे सिगारेट मागितली. मात्र सुमितने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोन मित्रांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सर्व मुलांना अटक केली आहे.

हे पण वाचा :

Boy Died : एका क्षणात 6 वर्षांच्या मुलाचा आईसमोरच झाला मृत्यू

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!

Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या

Leave a Comment