Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card चा वापर झपाट्याने वाढतो आहे. अशातच क्रेडिट कार्डद्वारे खरेदीचा ट्रेंड देखील खूप वाढलेला आहे. कारण क्रेडिट कार्डद्वारे आधी खरेदी केली जाते आणि नंतर पैसे द्यावे लागतात. अशातच जर एखादे प्रॉडक्ट खूप महाग असेल तर ते EMI (मासिक हप्ते) मध्ये देखील कन्व्हर्ट केले जाऊ शकते. EMI मध्ये ग्राहकांना एकाच वेळी मोठी रक्कम भरावी लागत नाही.

How Often Should I Use My Credit Card? | Credit Cards | US News

साधारणपणे, सर्वच क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून ग्राहकांना मोठे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याची सुविधा दिली जाते. मात्र काही अशा वस्तू देखील आहेत जे आपल्याला EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाहीत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात …

आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास खर्च, कपडे, लाइफस्टाइल आणि इन्शुरन्स सारख्या गोष्टींची खरेदी करून EMI मध्ये सहजपणे कन्व्हर्ट करता येते. तसेच त्यावर जास्त व्याज देखील द्यावे लागत नाही. Credit Card

Using Your Credit Card To Invest? Think Again. | FINRA.org

सोने आणि दागिने

2013 मध्ये RBI ने सोन्याच्या किरकोळ वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकांना Credit Card द्वारे केलेली सोने खरेदी EMI मध्ये कन्व्हर्ट करू नये असे सांगितले. इथे हे लक्षात घ्या कि, यापूर्वी अनेक बँकांकडून सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर EMI ची सुविधा दिली जात होती. मात्र 2018 मध्ये RBI द्वारे समान मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी केली गेली, ज्यानंतर बहुतेक बँकांनी दागिन्यांच्या Credit Card द्वारे खरेदीसाठी EMI पर्याय बंद केले.

Credit cards: Eligibility, different types of cards, rewards, charges - All  your questions answered

60 दिवसांनंतर कन्व्हर्ट होत नाही

HDFC बँक Credit Card वर 60 दिवस आधी किंवा त्यापूर्वी केलेल्या EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय देत नाही. काही बँका युझर्सना एक महिन्यापेक्षा जुनी खरेदी EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याची परवानगी देत ​​नाहीत. क्रेडिट कार्ड युझर्सना EMI मध्ये इंधन बिले किंवा कॅश ट्रान्सझॅक्शन विभाजित करण्याची परवानगी दिली जात नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/credit-card/best-credit-cards-online-shopping/

हे पण वाचा :

Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या

PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???

Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

Leave a Comment