टेनिस बॉलमधून जेलमध्ये गांजा पोहोचण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । अमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार बऱ्याच चक्रावून सोडणाऱ्या शकली लढवतात. पण अनेकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्यांचे हे प्रयन्त हाणून पाडले जातात. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) गांजा तस्करीचा असाच एक प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने टेनिस बॉलमधून गांजा (Cannabis) कारागृहात पोहोचवण्याचा काहींचा प्रयन्त फसला आहे. गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कोल्हापूरमधील (Kolhapur) जुना राजवाडा पोलिसांनी (Police) अटक केली आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही संशयित पुण्याचे आहेत.

ह्या पठ्ठ्यानी टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरला. त्यानंतर कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळताना मुद्दाम एक टोला हाणत गांजा भरलेला बॉल कारागृहात पोहचवण्याचा प्रयत्न या तिघा आरोपींचा होता. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना हटकले आणि त्यांचे बिंग फुटले. पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या बॉलमधून १५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयन्त करत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment