ड्युटीवर जाणाऱ्या डाॅक्टर तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न; रुग्णवाहिका येताच डॉक्टरला फेकले झुडुपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | घाटी रुग्णालयात नौकरी करंत असलेल्या महिला डाॅक्टर चे गुरुवारी मध्यरात्री दोघांनी चाकुचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी  तीन दिवसानंतर शनिवारी संध्याकाळी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे.

पिडीत डॉक्टर घाटी रुग्णालयात कार्यरत आहे. गुरुवारी मध्यरात्री नाईट शिफ्ट असल्यामुळे घाटाच्या सुपर स्पेशालिटी विभागाकडे पायी जातांना अंदाजे २७ ते ३०वर्षाच्या दोघांनी पाठीमागून येत चाकूचा धाक दाखवून महिला डाॅक्टरला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण समोरुन अॅम्ब्यूलंन्स येत असल्याचा आवाज येताच त्या आरोपींनी महिला डाॅक्टरला झुडपात फेकून दिले व पळून गेले.

हा प्रकार घाटीच्या अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर यांना कळल्यानंतर पिडीत महिला डाॅक्टरने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत. अपहरण करता हे पीडितेला झुडुपात अत्याचारा साठी घेऊन जात होते की, मग अपहरण करून इतर ठिकाणी घेऊन जात होते हे आधाप समोर आलेलं नाही. रुग्णवाहिका आल्याने पुढील अनर्थ टळला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment