स्वत:च्या मालकीच्या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : बेगमपुरा येथील अ‍ॅड. जयराज पांडे यांनी स्वत:च्या मालकीच्या भूखंडावर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार केली असून, या प्रकरणी मा. न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना विनापरवानगीने खड्डे खोदण्यात येत असल्याचे म्हटले आहे. याबाबत पांडे यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अ‍ॅड. पांडे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, माझ्या स्वत:च्या मालकीच्या हक्कातील भूखंड १६३५ या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या जागेवर खड्डे खोदण्याचे काम सध्या सुरू असून, माझी जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. या कामाबाबत न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना विनाकारण मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पांडे यांनी निवेदनाद्वारे मा. आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे केली आहे. तसेच या कामाबाबत चौकशी करून व कागदपत्रांची शहानिशा करावी, असेही जयराज पांडे यांनी दिलेल्या म्हटले आहे.