अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा दे धक्का!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड दक्षिणचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विलास उंडाळकर गटाला जोरदार धक्का दिल्याचं बोललं जातं.

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव पाटील यांनी देखील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिलाय. तसेच भोसलेंच्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेतलीये. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड तालुक्यातील विंग येथे झालाय. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी अतुल भोसलेंना पाठिंबा दिल्याने मतदार संघात भोसलेंची ताकद वाढली आहे .

कराड दक्षिणमधील १०० हून अधिक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील यांनी कराडच्या १४ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे हे नक्की.

इतर काही बातम्या-