कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ अतुल भोसले यांना कराड दक्षिणची उमेदवारि जाहिर केलीय.
तुम्ही अतुलबाबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्द यावेळी पाटील यांनी मतदारांना दिलाय. काही दिवस थांबा पहिली घोषणा बदलुन 288 पार अशी नवी घोषणा असेल असा विश्वासही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यकत केला.
विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार ठरला असलेची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाणांविरोधात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन रिंगणात उतरणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विजय संकल्प बुथ मेळाव्यात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतुल भोसले यांची उमेदवारीची घोषणा करुन तुम्ही आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्दही कार्यकर्त्याना दिलाय. काही दिवस थांबा पहिली घोषणा बदलुन 288 पार अशी नवी घोषणा असेल असा विश्वास ही व्यकत केला
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतुल भोसले विरुध पृथ्वीराज चव्हाण ही रंगतदार लढत होणार आहे असुन डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या. भाजपचे प्रदेश सरचिटणीस असुन राज्य मंत्री दर्जा असलेल्या पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.
अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.
पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपा सरकारने चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसलेंना मोठी ताकत दिली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही लढत रंगतदार होणार आहे.