हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AU Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता AU Small Finance Bank ने 12 डिसेंबरपासून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स आणि बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून रिटेल डिपॉझिट्ससाठी आपल्या एफडीवरील दरात 25 बेसिस पॉईंट्सनी वाढ केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांना 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याजदर मिळेल. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये बँकेकडून रिटेल डिपॉझिट्ससाठीच्या एफडीवरील वाईज दरात 60 बेसिस पॉइंट्सनी वाढ केली गेली होती. याशिवाय, एयू स्मॉल फायनान्स बँकेने 1 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांसाठी आपला सेव्हिंग डिपॉझिट्स रेट 7.25 टक्के वार्षिक केला आहे
AU Small Finance Bank च्या बचत खात्यावरील व्याज दर जाणून घ्या
आता बँकेकडून 1 लाख रुपयांपेक्षा कमीच्या बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर 3.50% दराने व्याज दिले जात आहे. तसेच 1 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमीच्या बचत खात्याच्या शिल्लक रकमेवर बँक 5.00% दराने व्याज मिळेल. यासोबतच बँक 10 लाख ते 25 लाखांपेक्षा कमीच्या बचत खात्याच्या शिल्लक रकमेवर 6.00% तर 25 लाख ते 1 कोटींपेक्षा कमीच्या बचत खात्याच्या शिल्लक रकमेवर 7.00% व्याज दर देईल. त्याच बरोबर आता AU Small Finance Bank कडून 1 कोटी आणि 10 कोटी पेक्षा कमीच्या बचत खात्याच्या शिल्लक रकमेवर 7.25% व्याजदर देत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बचत खात्यांवरील व्याज दररोज निर्धारित केले जाईल आणि बँकेद्वारे मासिकरित्या दिले जाईल.
बँकेचा FD वरील व्याज दर जाणून घ्या
आता AU Small Finance Bank कडून 7 दिवस ते 1 महिना आणि 15 दिवसांच्या FD वर 3.75% दराने आणि 16 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 4.25% दराने व्याज मिळेल. तसेच आता बँक 3 महिने 1 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर 5.00%, 6 महिने, 1 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर 6.10%,12 महिने ते 15 महिन्यांच्या FD वर 7.35%, 15 महिने ते 24 महिन्यांच्या FD वर 7.20%,24 महिने 1 दिवस ते 45 महिन्यांच्या FD वर 7.75% आणि 45 महिने 1 दिवस ते 120 महिन्यांच्या FD वर 7.20% व्याज देईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.aubank.in/personal-banking/term-deposits/fixed-deposits/interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदी महागले, आजची किंमत तपासा
Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ
7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या