हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील दिग्गज कार कंपनी ऑडी इंडियाच्या गाड्या जोरदार चर्चेत असतात. उद्या ऑडी (Audi A8 L 2022) आपली नवीन लक्झरी सेडान कार ऑडी A8 L 2022 लॉन्च करणार आहे.ऑडी A8 L हि गाडी मर्सिडीज एस-क्लास आणि BMW 7 या कार ला तगडी फाईट देईल.
Audi A8 L ची वैशिष्ट्ये-
Audi A8 L हि एक अत्याधुनिक कार आहे. या गाडीच्या (Audi A8 L 2022) समोरील बाजूस एक मोठी लोखंडी जाळी आहे ज्यामध्ये मॅट्रिक्स एलईडी टेललाइट्स आणि दोन्ही बाजूंना स्लीक एलईडी लाइट बार्स जोडलेले आहे. तर गाडीच्या आतील बाजूस इन्फोटेनमेंट स्क्रीन अपडेट केली गेली आहे. कारमध्ये रियर रिक्लिनर, फूट मसाजर आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसह रिअर रिलैक्सेशन पॅकेज देखील असेल.
कसे आहे गाडीचे इंजिन- (Audi A8 L 2022)
Audi A8 L ला 3.0-लिटर TFSI पेट्रोल इंजिन मिळते जे 48V हायब्रिड सिस्टम आणि क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आहे. हे इंजिन 340 एचपी पॉवर आणि 540 NM टॉर्क जनरेट करते. यासह, कंपनीने हे देखील हायलाइट केले आहे की ड्राइव्ह डायनॅमिक्स आणि एअर सस्पेंशन सेट-अप मोठ्या प्रमाणात सुधारण्यात आली आहे.
बुकिंग तपशील-
नवीन Audi A8 L चे बुकिंग (Audi A8 L 2022) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाले. कंपनी 10 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या लक्झरी सेडानची बुकिंग करत आहे.
हे पण वाचा :
OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत
Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार