पनवेल : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या कलियुगात माणसाची माणुसकी हरवत चालली आहे. आजकाल कुठे अपघात झाला तर मदत करण्यापेक्षा लोकं मोबाईल काढून व्हिडीओ शूट करत बसतात. परंतु, अशा काळात काही उदाहरणे अशी पाहायला मिळतात की माणुसकी अजूनही शिल्लक असल्याची जाणीव होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण आपला जीव धोक्यात घालून एका वासराला वाचवताना (the young calf was rescued safely) दिसत आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील वावंजे परिसरात घडली आहे.
कौतुकास्पद ! समोर साक्षात मृत्यू असतानादेखील तरुणांनी जीव धोक्यात घालून वासराचे प्राण वाचवले pic.twitter.com/zWIJnmKuCs
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 11, 2022
काय आहे नेमकी घटना ?
पनवेल तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या गाईच्या वासराला (the young calf was rescued safely) स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा (the young calf was rescued safely) व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या तरुणांचे कौतुक केले आहे. मलंगगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या वावंजे परिसरात एका दरीत 3 ते 4 दिवसांपासून एक गाईचं वासरू पडलं होतं. या वासराला पुन्हा वर येणं शक्य नव्हते. त्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते.
या घटनेची माहिती मलंगगड परिसरातील काकडवाल गावातल्या स्थानिक तरुणांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवत वासराची सुटका (the young calf was rescued safely) केली. अशा घटनांमुळे माणुसकी अजूनही जीवंत असल्याची जाणीव होते. काही दिवसांपूर्वी असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात पावसाच्या पाण्यामुळे विजेचा प्रवाह एका खांबाद्वारे पाण्यात पोहचला होता. याचदरम्यान, एक गाई तिथून जात असताना तिला याचा शॉक लागला. गाई स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती. ही घटना पाहून तिथं उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी कापडाच्या माध्यमातून गाईच्या पायाला बांधून बाजूला ओढले आणि गायीचा जीव वाचवला.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार