औरंगाबाद प्रतिनिधी | स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेण्या वातावरणात शहरातील सद्यस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या पत्रकारांची मनपातर्फे covid-19 साठी चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्व 45 पत्रकारांची चाचणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलतांना दिली.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोणाची बाधा झाली आणि पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबईच्या महापौरांनी स्वतःला घरातच होम क्वारंटाईन करून घेतले याच धर्तीवर काल महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 45 पत्रकारांचा लाळेचा नमुना घेण्यात आला होता. यात विशेषतः स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांपर्यंत दररोज बातम्या पोहोचवणारे सर्व पत्रकारांनी लाळेचे नमुने दिले होते. तसेच शहरातील पत्रकारांशी संपर्कात असल्यामुळे महापौरांनीही स्वतःच्या लाळेचा नमुना ही चाचणीसाठी दिला होता. या चाचणीचा अहवाल आज आला असून सुदैवाने महापौरासह सर्व पत्रकारांचे अहवाल नकारात्मक आले. त्यामुळे पत्रकारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
तसेच यापुढेही सतर्कता बाळगत पत्रकार आपल्या कर्तव्याचे निर्वाहन करतील अशी मला आशा आहे असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले