औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 4 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 10 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 869 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3527 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 12 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 5 आणि ग्रामीण मधील 7 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील

देवळाई रोड 1 कार्तिक नगर 1, गारखेडा 1 आणि अन्य 3 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात गंगापूर 2 वैजापूर 1 पैठण 1 रुग्ण आढळले आहे. पैठण येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment