औरंगाबाद – सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 या महामार्गावर औट्रम घाटीतील साखळी क्रमांक 376+000 ते 390+000 मधील रस्ता दिनांक 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटीतील मार्ग खचला होता व घाटात जागाजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजूस दरी व दुस्ऱ्या बाजूस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता बंद करुन वाहतूक कळविण्यात आलेली होती.
सद्या घाटात दुरुस्तीचे काम सुरु असून अवजड वाहनांसाठी औरंगाबाद- देवगांव रंगारी- शिऊर बंगला –नांगगावं-मोलगाव-धुळे अशा पद्धतीने वाहतूक कळविण्यात आलेली आहे. औरंगाबाद- चाळीसगांव वाहतूक करण्याऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी औरंगाबाद-देवगांव रंगारी-शिऊर बंगला-नांदगाव-चाळीगाव अशा पद्धतीने वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
नागरिकांनी दक्षतापूर्वक वाहतुकीच्या सर्व नियमांचे व सुचनांचे वरील प्रमाणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हिा आपत्ती व प्राधिकरण, औरंगाबाद यांनी आवाहन केले आहे.