औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोनाबधितांची संख्या पाहता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहराचा कोरोनाबधितांचा अहवाल पाहिला तर काल रात्रीपर्यंत ५५८ कोरोनाबधितांची संख्या होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ४४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
औरंगाबादचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याबरोबर चिंता देखील वाढताना दिसून येत आहे. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाबधितांची संख्या सहाशेच्या वर गेली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतील ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामध्ये न्याय नगर येथील-२, संजय नगर-१, एसआरपीएफ, सातारा परिसर-१, कोतवालपुरा-१, सिडको -एन-४ या भागातील-१, सातारा परिसर सदानंद नगर-८, बीड बायपास रोड -१, भवानीनगर, जुना मोंढा-३, पुंडलिक नगर गल्ली क्रमांक सहा येथील-१, दत्त नगर-कैलास नगर-५, कैलास नगर-१, बायजीपुरा-१, रामनगर -६, किल्लेअर्क-८ आणि ग्रामीण भागातील सातारा गाव -१, गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथील -३ असे एकूण ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामध्ये २७ पुरुष आणि १७ महिलांचा यात समावेश आहेत.
औरंगाबाद मध्ये ४४ कोविडबाधित रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील ४४ कोविडबाधित रुग्णांची आज सकाळी वाढ झाल्याने कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली आहे. त्यापैकी ९२ कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४९६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या आज सहाशेच्या वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय आतातरी याकडे गांभीर्याने बघावे आणि घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनामुळे १४ वा बळी
औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनामुळे आज १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, रामनगर येथील ८० वर्षीय रुग्णाचा मध्यरात्री १ वाजून १० मिनिटाने मृत्यू झाला. या रुग्णाला ताप येणे, खोकला, दम लागणे यामुळे ८ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्या रुग्णाचे स्वब घेण्यात आले. ९ मे रोजी त्या रुग्णाचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. त्या रुग्णाचे ऑक्सीजनचे प्रमाण देखील अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रुग्णांचा आज मृत्यू झाला . त्यामुळे शहरात कोरोनाबाधित मृत्यू होण्याची संख्या आज १४ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.