सख्खा भाऊचं निघाला पक्का वैरी! भावानेच अंगावर रॉकेल टाकून भावाला जाळलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । घरघुती वादातून झालेल्या भांडणातून झोपलेल्या भावाच्या अंगावर रॉकेल ओतून भावानेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास शहरातील बनेवाडी भागात समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

बनेवाडी भागात राहणाऱ्या वरून मुकुंद कुमावत वय-32 या तरुणाला त्याच्याच भावाने जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकरणा विषयी जखमी कुमावत यांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपत असताना भावाणेच अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्याजवळ एकही नातेवाईक आले नाही. असे तेथील परिचारिका यांनी सांगितले.

कुमावत यांचा चेहरा,छातीसह कामरेवरचा संपूर्ण जळलेला आहे. या प्रकरणी अधिक माहितीची शहानिशा करण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या लँडलाईन क्रमांकावर तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता फोनला उत्तर न दिल्याने या प्रकरणी अधिक माहिती मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.