औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे.
औरंगाबादला जाण्यासाठी कन्नड घाट हा जवळचा मार्ग आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात जोरात पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. धुळ्याहून औरंगाबादला जाण्यासाठी हा मार्ग सर्वात जवळचा आहे. परंतु आज सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे कन्नड घाटात दरड कोसळली यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
या महामार्गावरून वाहन अनु नये असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच हा घाट बंद झाल्याने कन्नड- पाणपोई- चापानेर- शिऊर बंगला- नांदगाव- चाळीसगाव या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांनी दौलताबाद टी पॉइंटवर बॅरिकेट्स लावून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.