औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यात क आणि ड सोसायट्यांमधून आलेले चौदा अर्ज बाद ठरले. त्यानंतर शेतकरी महासंघ पैठण मधून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे व खुलताबादहुन किरण पाटील डोणगावकर हे बिनविरोध विजयी झाले.
आता 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात असून त्यांना रविवारी चिन्हाचे वाटप करण्यात येईल, असे निर्वाचन अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितले. या निवडणुकीची 21 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 22 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.वस्तुतः आतापर्यंत 21 जागा असायच्या मात्र या वेळी वैयक्तिक मतदार संघ बाद झाला. कारण बँकेच्या संस्थापक सदस्यांपैकी कोणीही हयात नाही. पणन प्रक्रिया मतदारसंघातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बिनविरोध निवडून येण्याची चर्चा असतानाच आता ही निवडणूक चुरशीची होईल. प्रकाश मुथा आणि शहनवाज खान यांच्याशी सत्तार यांचा मुकाबला राहणार आहे.
हे उमेदवार ठरले छाननीत बाद
वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे,भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे संजय वाघचौरे, सुनिता विलास चव्हाण, (खुलताबाद) किशोर बलांडे( फुलंब्री), जेके जाधव ,अनिल बोरसे, नंदकुमार गांधीले,राहुल सावंत ,प्रदीप शिंदे, पदमाबाई म्हस्के ,राजू पोळ, सुनिता सोलाटे, देविदास मनगटे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा