औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शषाद्री गौडा असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. घाटी रुग्णालयात ते मेडिसिन विभागात साह्ययक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. गौडा यांनी बेगमपुरा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
हातावर स्वतःच औषधी इंजेक्शन मारून ही आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलीसानी घराची पाहणी केली असता त्यांना घरात एक चिठ्ठी आढळून आली. आयुष्यत हवी तशी प्रगती न झाल्याने मागील १५ दिवसापासून आत्महत्या करण्याचे विचार मनात येत होते. मानसिक तणावातून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचं पोलिसांनी सुसाईड नोट वाचून कळवलं आहे. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल शषाद्री कुणाशी बोलला होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.