औरंगाबाद – शहरात गेल्या दोन वर्षातील जानेवारी येथील नीचांकी किमान तापमानाची (8.0) शनिवारी चिकलठाणा वेधशाळेने नोंद घेतली.
शहरात 17 जानेवारी 2020 रोजी 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर 30 जानेवारी 2019 रोजी 12.8 किमान तापमान नोंदविले आहे. या दोन वर्षांच्या तुलनेत शनिवारी नोंद झालेले किमान तापमान जानेवारीतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. शहरात 23 जानेवारीपासून किमान तापमानात झपाट्याने घसरण होत गेलेली थंडीची लाट आली. आगामी दिवसात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.
तर शहरातील एमजीएम वेधशाळेत काल 7.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.