फोन वापरते म्हणून वडील रागावल्याने मुलीने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या मुलांचे मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. यामध्ये मोबाईलचा अति वापर करत असल्याने वडिल मुलीवर ओरडले. यांनतर वडील ओरडल्याचा राग आल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या (Sucide) केली आहे. तिने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. या घटनेमुळे औरंगाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आरती सुनील सिदलंबे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगर रहिवाशी असून पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी वडील सुनील सिदलंबे हे काम आटोपून घरी परतले. त्यावेळी त्यांना आरतीच्या हातात मोबाइल दिसला. आणि ते तिच्यावर रागावले.

यानंतर वडील रागावले असल्याचा राग आल्याने आरतीने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या (Sucide) केली. या घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. तसेच किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याने मुलांना कोणत्या भाषेत समजवायचं हा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका