आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. भारतीय टॅक्स डिपार्टमेंटद्वारे पॅन कार्ड जारी केले जातात. पॅन कार्डमध्ये 10 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतात. हे लक्षात घ्या कि, पॅन कार्डचा वापर फक्त टॅक्स संबंधित कारणांसाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही केला जातो. मात्र काही वेळा पॅन कार्डमध्ये काही चुका असतात ज्या योग्य वेळी सुधारल्या गेल्या नाहीत तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

What is Pan Card: Eligibility, How to Apply, Documents Required etc.

सध्याच्या काळात तर Pan Card आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे जर आपल्या पॅन कार्डमध्ये काही चुका असतील तर ते आधार कार्डशी लिंक करता येणार नाही. कारण, पॅन आणि आधारमधील नाव आणि जन्मतारीख एकच असावी.

जर आपल्या Pan Card मध्येही काही चूक असेल आणि ती सुधारायची असेल तर त्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता हे काम आपल्याला घर बसल्या करता येतील. असे या=बऱ्याचदा घडते कि आपल्या पॅन कार्डमधील जन्मतारीख किंवा नावामध्ये चुका होतात. आता या चुका आपल्याला स्वतःला दुरुस्त करता येतील.

क्या PAN Card भी कभी एक्सपायर होता है? जानिए आपका सबसे महत्वपूर्ण डॉक्यूमेंट कब तक रहता है वैलिड | Zee Business Hindi

अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card

पॅन कार्डमधील जन्मतारीख किंवा नावातील चूक सुधारण्यासाठी सर्वांत आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्कला भेट द्यावी लागेल.

इथे Application Type वर जाऊन Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर काही माहिती विचारली जाईल. ती भरल्यानंतर आणि योग्य कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. यानंतर आधार, पासपोर्ट किंवा इतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. त्यानंतर पेमेंट करण्यास सांगितले जाईल.

Lost PAN card? Here's how to download e-PAN | Personal Finance News | Zee News

पेमेंट केल्यानंतर बँकेचा रेफरन्स नंबर आणि ट्रान्सझॅक्शन नंबर मिळेल. तो सेव्ह करा आणि नंतर Continue वर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये पॅन कार्डमधील चूक सांगावी लागेल. यानंतर फक्त आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. यानंतर पुढील काही दिवसांत आपले पॅन कार्ड दुरुस्त करून मिळेल.

तसेच Pan Card शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी NSDL शी हेल्पलाइन क्रमांक 1800-180-1961 आणि 020-27218080 वर संपर्क साधता येईल. याशिवाय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या http://[email protected] आणि http://[email protected] या ई-मेल आयडीवर देखील पाठवता येईल.

हे पण वाचा :
Business Idea : हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांनी वाढ, आता कर्ज आणखी महागणार
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा