औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात शहरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. यामुळे कोरोनाला आळा घालण्यात औरंगाबाद जिल्हा प्रशासन यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. देशार कोरोना बाधितांचा आकडा १५४ वर गेला असताना औरंगाबाद मध्ये मात्र कोरोना रुग्न न सापडल्याने हे दिलासादायक असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील एकमेव कोरूना पॉझिटिव प्राध्यापिकेच्या अगदी जवळून संपर्क आलेल्या 36 वर्षीय सहयोगी प्राध्यापिकेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा अहवाल दिलासादायक असून औरंगाबाद शहर दुसऱ्या टप्प्यात आलेले नाही असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले.
सदर सहयोगी प्राध्यापिकेला 16 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयातील अलगीकरण वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे आवश्यक तपासण्या नंतर महिलेच्या थुंकी चा नमुना पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरल संस्थेत पाठविण्यात आला होता. स्वॅप तपासणीचा अहवाल बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून हा अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अहवाल पॉझिटिव्ह आला असता तर शहरासाठी चिंता ठरण्याची भीती व्यक्त होत होती. अहवाल पोझिटिव आल्यानंतर रुग्णालयातर्फे त्या प्राध्यापिकेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरूना च्या पहिल्या टप्प्यात परदेशातून येणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात परत आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांना बाधा होते. सदर सहयोगी प्राध्यापक अहवाल नकारात्मक आल्याने अद्याप तरी शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नाही. प्राध्यापिकेचे संपर्कातील अन्य लोकांचा अहवाल काय येतो याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा