500 हून अधिक रेल्वे गाड्या केल्या रद्द; घराबाहेर पडण्यापूर्वी चेक करा लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता तसेच प्रवाशांची संख्या अत्यल्प झाल्याने खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये एक्सप्रेस, प्रवासी गाड्या व काही विशेष गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज ५२४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात जन शताब्दी, सुपरफास्ट गाड्या, मेल एक्स्प्रेस, पॅसेंजरसह अनेक गाड्यांचा समावेश आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाऊन जाणून घ्या ट्रेनची स्थिती
रेल्वे प्रवासी https://enquiry.indianrail.gov.in या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन व तपशिल तपासू शकतात. याशिवाय स्टेशनवर केल्या जाणाऱ्या घोषणांमधून तुम्हाला तुमच्या ट्रेनबाबत माहिती मिळते. आपण १३९ क्रमांकावर मेसेज करुन ट्रेन रद्द झाल्याची माहिती देखील मिळवू शकता. रद्द झालेल्या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या आरक्षित तिकिटाचा पूर्ण परतावा मिळेल असं रेल्वकडून सांगण्यात आलं आहे.

Capture11दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment