औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 205 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3485 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 30 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 27 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील
पिसादेवी 1,बहादूरपुरा 1,आयकॉन हॉस्पिटल 1, गारखेडा परिसर 2, समतानगर 1, न्यू विषाल नगर, आणि इतर 4 रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागातील औरंगाबाद 1, कन्नड 4,वैजापूर 8,गंगापूर 2, पैठण 2 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर गंगापूर येथील 75 वर्षीय एका महिलेचा आणि 66 वर्षीय पुरुषाचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे.