औरंगाबादमध्ये तरुणाने गिळला चक्क टूथब्रश! डॉक्टर झाले अवाक, असा काढला बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । नाणं, बटण, गोट्या, खिळा, पिना अशा वस्तू लहान मुलांनी गिळल्याच्या घटना आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. मात्र औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने गिळलेली वस्तू ऐकून कोणीही चकित होईल. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीने थेट टूथब्रश गिळल्याचा (Man swallows toothbrush) प्रकार उघडकीस आला आहे.

टूथब्रश गिळल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पोटात कमालीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. डॉक्टरांनी सिटीस्कॅन करुन तरुणावर शस्त्रक्रिया केली.

सर्जरीमध्ये 33 वर्षीय तरुणाच्या पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. हे पाहून डॉक्टरही अवाक झाले. तरुणाने गिळलेला टूथब्रश हा थोडाथोडका नव्हे, तर तब्बल अर्धा फूट लांबीचा होता. इतक्या लांबीचा टूथब्रश तरुणाने का आणि कसा गिळला, हा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. सर्जरीनंतर या रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे. (Aurangabad Man swallows toothbrush Doctors remove after surgery)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment