औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचे कामकाज थकीत ठेवावे असे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामकाज सुरू ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रात ४०० पेक्षा अधिक कर्मचार्यांची बैठक मनपाकडून आयोजित करण्यात आल्याचे समजत आहे.
मतदार याद्या तयार करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये या बैठकीने खळबळ उडाली होती. प्रत्येक कर्मचारी रुमाल बांधून बैठकीस आला होता. एकाच ठिकाणी जास्त नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून मनपातर्फे व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. बुधवारी महापौर आयुक्तांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दहापेक्षा अधिक पत्रकार नको म्हणून तीन टप्प्यात पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले. मात्र कर्मचार्यांची बैठक बोलावल्याने कर्मचार्यांच्या आरोग्याची मनपा प्रशासनाला काळजी नाही का असा सवाल उपस्थित झाला आहे.
दरम्यान, मनपाच्या निवडणूक विभागाने बुधवारी सायंकाळी मौलाना आझाद संशोधन केंद्रात मतदार यादीचे काम करणाऱ्या प्रगणकांना ची बैठक आयोजित केली. या बैठकीला तब्बल 400 पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीमुळे अगोदरच कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ होती. मात्र तरीही अनेक कर्मचाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली होती.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा