MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, तय्यब नाईकवाडी अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणकडून मिळालेल्या कंत्राटाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यातून नगरसेवक नाईकवाडी यांचे भाऊ व कंत्राटदार तय्यब यांना जाबविचारताच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. हा प्रकार नाईकवाडीयांना कळताच ते घटनास्थळी धावले. त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार तत्काळ मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तक्रारदारांची वाट पाहण्यात आली. परंतु, कोणीही पुढे आले नाही. त्यावर अखेर, भादंवि कलम १६०, १८८ व २६९ नुसार गुन्हे दाखल करत उपनिरीक्षक ए. डी. नागरे यांच्याकडे तपास दिला. यात जखमी नगरसेवक उपचार घेऊन घरी गेले, परंतु शुक्रवारीसंध्याकाळपर्यंत तक्रार देण्यासाठी कोणीही आले नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.